Call : 02187 221170, 221370
Mail : ho@sangolaurbanbank.com
CHAIRMAN MESSAGE
Home / Chairman Message
Chairman Message
जागतिकीकरणामुळे भारताच्या आर्थिक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहे. त्याचाच परिणाम सहकार क्षेत्रावर होत आहे. यासाठी सहकाराच्या मूलभूत तत्वाचा अंगीकार करून स्पर्धात्मक युगात सहकाराच्या उत्कर्षासाठी सर्वसामान्यांच्या हितासाठी बँकेची वाटचाल सुरु आहे.
बँकेने आकर्षक व्याजदर , कर्जाच्या विविध योजनेसह आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची जोड व ग्राहक सेवेचे गुणवत्तापूर्वक योगदान म्हणून कोअर बँकिंग प्रणाली, आर.टी.जी.एस. , एन.ई.एफ.टी. सुविधा , ई पेमेंट , एस. एम. एस. बँकिंग इ. सेवा देत आहे. सध्या बँक हि स्वतःच्या वास्तूत स्थलांतर झाली आहे.
मार्च २०१५ अखेरच्या प्रगतीवरून बँकेस दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लि. मुंबई यांच्याकडून सन २०१४-२०१५ शाळांसाठी रु १०० कोटी ते रु ५०० कोटी ठेवी असलेल्या पुणे विभातून उत्कृष्ठ बँक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. सोलापूर ज़िल्हा नागरी सहकारी बॅंक्स को- ऑप. असोसिएशन लि; सोलापूर यांच्याकडून दर चार वर्षांनी दिला जाणारा आदर्श बँक पुरस्कार सलग दुसऱ्यांदा प्राप्त झाला असून कोल्हापूर येथील अविस प्रकाशन व पुणे येथील गॅलॅक्सि इनमा यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०१४-१५ या सालासाठी रु १०० कोटी ते रु १७५ कोटी ठेवी या गटात पुरस्कार मिळाला आहे.
आपल्या बँकेचा एकूण व्यवसाय हा रु २०३ कोटीवरून दि. ३१ मार्च २०१६ अखेर २५० कोटींचा झालेला आहे. व्यवसाय वाढीचा वेग हा २३% आहे. एकूण कर्जे दि. ३१ मार्च २०१५ च्या रु ७८.४० कोटी वरून दि. ३१ मार्च २०१६ अखेर ९९.०८ कोटीवर पोहोचली आहे. कर्जवाढीचे प्रमाण २६% आहे. बँकेस करपूर्व नफा रु. २७१.९५ लाख इतका नफा झाला तर करानंतरचा नफा रु. १६०.८० लाख इतका आहे. गतसल रु. १२७.०१ लाख इतका होता. तो मागील वर्षापेक्षा रु. ३३.७९ लाखाने वाढला आहे.
मला सांगावयास अभिमान वाटतो, बँकेने चालू आर्थिक वर्षात वरील सर्वच बाबीत झालेली वाढ ही बँकिंग क्षेत्राच्या सरासरी वाढीपेक्षा अधिक आहे.
तसेच नेहमीच्या बँकिंग व्यवसायाबरोबर आपली बँक सहकार व बँकिंग क्षेत्रात सातत्याने अग्रक्रम राहिली आहे. आपली बँक सहकारी तत्वावर चालत असल्यामुळे सामाजिक बांधिलकीचे भान विसरलेले नाही यावर्षीही वेगवेगळे उपक्रम बँकेने हाती घेतले होते. याची तपशिलवार माहिती संचालक मंडळाच्या अहवालात नमूद केली आहे.